‘कोकणसाठी स्वतंत्र ‘एक्स्प्रेस वे’चा प्रस्ताव’; खासदार सुनील तटकरेंची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 01:09 AM2020-10-14T01:09:19+5:302020-10-14T01:09:50+5:30

या समितीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काम करतात. शिवाय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांचाही यात समावेश आहे.

‘Proposal for a separate‘ Express Way ’for Konkan’; Information of MP Sunil Tatkare | ‘कोकणसाठी स्वतंत्र ‘एक्स्प्रेस वे’चा प्रस्ताव’; खासदार सुनील तटकरेंची माहिती

‘कोकणसाठी स्वतंत्र ‘एक्स्प्रेस वे’चा प्रस्ताव’; खासदार सुनील तटकरेंची माहिती

Next

चिपळूण (जि.रत्नागिरी) : कोकणात पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व सागरी महामार्ग असताना आणखी स्वतंत्र ‘एक्स्प्रेस वे’ उभारला जाणार आहे. त्याला राज्य सरकारने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

चिपळूण दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांनी सांगितले, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण व सागरी महामार्गाचे काम पूर्ण केले जाणारच आहे. त्याव्यतिरिक्त स्वतंत्र ‘एक्स्प्रेस वे’चा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. या प्रस्तावाला सरकारने तत्वत: मान्यता दिली असून, त्याचा पाठपुरावा मंत्रिमंडळाची पायाभूत समिती करत आहे. या समितीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काम करतात. शिवाय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांचाही यात समावेश आहे.

Web Title: ‘Proposal for a separate‘ Express Way ’for Konkan’; Information of MP Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.