रत्नागिरी जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या ‘त्या’ तेरा बांगलादेशींना ‘डिपोर्ट’ करण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 05:44 PM2024-11-29T17:44:16+5:302024-11-29T17:46:02+5:30
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नाखरे - कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या १३ बांगलादेशी घुसखाेरांना पाेलिसांनी ताब्यात ...
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नाखरे - कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या १३ बांगलादेशी घुसखाेरांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना ‘डिपोर्ट’ करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस विभागाने शासनाकडे पाठवला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
नाखरे येथील चिरेखाण मालक आसिफ सावकार (रा. पावस, ता. रत्नागिरी) याने एजंटद्वारे १३ बांगलादेशी कामगारांना बोलावून चिरेखाणीवर ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या चिरेखाण मालकाचा या गुन्ह्यात सहभाग दिसला तर त्याला आणि ज्या एजंटने या कामगारांना इथे आणले त्याला आरोपी धरून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली आहे.
बांगलादेशींविराेधात स्वतंत्र माेहीम
तसेच घुसखोरी केलेल्या अन्य बांगलादेशींविरोधात पोलिस विभागाने स्वतंत्र मोहीम उघडली आहे. त्यासाठी पथक तयार करून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहेत.