रत्नागिरीतील गुहागरात सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा
By अरुण आडिवरेकर | Published: June 30, 2023 07:18 PM2023-06-30T19:18:36+5:302023-06-30T19:19:10+5:30
संकेत गाेयथळे गुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे ...
संकेत गाेयथळे
गुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (३० जून) गुहागरात माेर्चा काढण्यात आला. गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सरकारविरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना सरकारविराेधात निवेदन देण्यात आले.
गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत असताना सरकारच्या निषेधार्थ अदानी अंबानी तुपाशी, जनता मरते उपाशी, पन्नास खोके खातात बोके, खोटी आश्वासने बंद करा, अशा प्रकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
सत्तेवर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवाराची सुरक्षा जाणीवपूर्वक कमी केली. नवीन सरकार स्थापनेनंतर राज्यभरात विविध ठिकाणी दंगली होत आहेत. राज्यकर्त्यांकडूनच समाजामध्ये तेढ निर्माण करून असे प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक सूडबुद्धीने विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींची सुरक्षा कमी करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व कामांना जाणीवपूर्वक स्थगिती दिल्याचे म्हटले आहे. यासह विविध मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.