ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:29 AM2021-05-15T04:29:55+5:302021-05-15T04:29:55+5:30
खेड : लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या ...
खेड : लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांच्याकडे केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत
आहे. रांगेत उभे राहूनही बऱ्याच वेळा लस न घेताच माघारी परतावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक समस्या सतावत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ठ परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्यास ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल. काही ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस विविध कारणांमुळे अद्यापही मिळालेला नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक चिंतेत आहेत. या साऱ्या बाबींचा गांभीर्याने विचार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव राजन दांडेकर यांनी केली आहे.