वांद्री केंद्राला रुग्णवाहिका प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:15+5:302021-06-11T04:22:15+5:30
देवरुख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि माभळे, कुरधुंडा, ओझरखोल, कोळंबे, आंबेड आदी गावांमधील रुग्णांना ...
देवरुख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि माभळे, कुरधुंडा, ओझरखोल, कोळंबे, आंबेड आदी गावांमधील रुग्णांना रुग्णवाहिका तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, यासाठी मंत्री उदय सामंत यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. या केंद्राला रुग्णवाहिका मिळाल्यामुळे आता ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार आहे.
मंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केले. जिल्ह्याच्या खनिकर्म निधीतून पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्याने या आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका तसेच आरोग्यविषयक साहित्य मिळाले आहे.
जिल्हा परिषद सदस्य माधवी मनोहर गीते, उपसभापती परशुराम वेल्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत या सुविधा आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका, ऑक्सिमीटर, ट्रॉली, पाच खाटा आदी आरोग्यविषयक सुविधा प्रदान करण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकुमार फास्के, वांद्री सरपंच अनिषा नागवेकर, मनीषा बने उपस्थित होत्या.