सार्वजनिक ग्रंथालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:30+5:302021-09-27T04:34:30+5:30
शाळेची उभारणार बाग लांजा : तालुक्यातील पुनस येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा पुनस-कुडूवाडी शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद ...
शाळेची उभारणार बाग
लांजा : तालुक्यातील पुनस येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा पुनस-कुडूवाडी शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा साळवी यांच्या हस्ते शाळेच्या आवारातील बागकामाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घडशी यांची निवड
लांजा : कुर्णे गावचे सामाजिक कार्यकर्ते गणपत तथा दादा घडशी यांची कुर्णे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. घडशी यांनी सह्याद्री कुणबी संघाच्या माध्यमातून कोकणातील समाज बांधवांना एकत्रित करून संघटना बांधणीचे काम केले आहे.
निकाल जाहीर
रत्नागिरी : येथील प्रोत्साहन युवक संघटनेतर्फे आयोजित गणपती सजावट स्पर्धेत मिरजोळे पाडावेवाडीतील श्रीकांत पाडावे परिवाराचा देखावा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला आहे. द्वितीय क्रमांक संजय वर्तक (कुवारबाव), तृतीय क्रमांक नंदकुमार पाले (कापडगाव) यांनी मिळविला आहे. स्पर्धेत २० स्पर्धक सहभागी झाले होते.
मुळ्ये यांची निवड
देवरूख : येथील माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांच्यावर आता भारतीय जनता पक्षाच्या देवरूख शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुधीर यशवंतराव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुळ्ये यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी निवड केली आहे.