चिपळुणात सार्वजनिक शौचालय कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:22 AM2021-07-20T04:22:23+5:302021-07-20T04:22:23+5:30
चिपळूण : शहरातील पाग लेनवाडी येथे नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालय कोसळले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन ...
चिपळूण : शहरातील पाग लेनवाडी येथे नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालय कोसळले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन वर्षांपूर्वीच या सार्वजनिक शौचालयाची दुरूस्ती करण्यात आली हाेती. त्यानंतर सुरू असलेल्या मुसळधार पावसात हे शौचालय कोसळले आहे. त्यामुळे या कामाचा दर्जाच आता समाेर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात नगर परिषदेने उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांचा मुद्दा गाजत आहे. सार्वजनिक शौचालयांवर लाखोंचा खर्च होत असल्याने त्याविषयीची उलटसुलट चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात सुरू आहे. सार्वजनिक शौचालयांच्या कामात जाणीवपूर्वक खर्च वाढवला जात असल्याचा आरोपही काही नगरसेवकांनी केला होता. नगर परिषद अधिनियम ५८ (२) अंतर्गत एका शौचालयासाठी सुमारे २८ लाख रुपये खर्च केल्याने कळीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या शौचालयांविषयी चर्चा सुरू असतानाच सोमवारी नगर परिषदेने बांधलेले सार्वजनिक शौचालय कोसळले. पाग लेनवाडी येथील हे शौचालय असून, नागरिक त्याचा नियमित वापर करत होते. हे शौचालय जुने असले तरी स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत दोन वर्षांपूर्वी या शौचालयाची दुरूस्तीही करण्यात आली होती.
------------------------
चिपळूण शहरातील पाग लेनवाडी येथील सार्वजनिक शाैचालय मुसळधार पावसात काेसळले आहे.
190721\1752-img-20210719-wa0029.jpg
चिपळुणात सार्वजनिक शौचालय कोसळला