खापणे महाविद्यालयात ‘सह्यगिरी’ वार्षिक अंकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:58+5:302021-08-20T04:35:58+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ‘सह्यगिरी’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन पंचायत समिती सदस्य ...
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ‘सह्यगिरी’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव व जागृती सेवा मंडळ, रायपाटणचे अध्यक्ष अमोल गांगण यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या वार्षिक उपक्रमांचा आणि कार्याचा आलेख म्हणजेच सह्यगिरी वार्षिकांक होय.
कोरोना कालखंडातील अनुभव विश्वावर विद्यार्थ्यांनी केलेले स्वरचित लेखन यामध्ये आले आहे. संस्था विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या त्रिवेणी कार्याचा अनोखा संगम म्हणजे सह्यगिरी वार्षिकांक होय. यावेळी संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत, सीडीसी कमिटीचे सदस्य मनोज गांगण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, प्रा. एन. जी. देवन, डॉ. एस. एस. वाघमारे, प्रा. एस. एस. धोंगडे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, नरेश पाचलकर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वार्षिक अंकाच्या मांडणी संदर्भात संस्थेचे अध्यक्ष मनोहर खापणे व संस्था पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.