शासकीय व खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट अहवाल प्रसिद्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:29+5:302021-07-04T04:21:29+5:30

रत्नागिरी : राज्यभरातील विविध भागातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन गळती व इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागून रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याला ...

Publish Oxygen, Fire, Electrical Audit Reports in Government and Private Hospitals | शासकीय व खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट अहवाल प्रसिद्ध करा

शासकीय व खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट अहवाल प्रसिद्ध करा

Next

रत्नागिरी : राज्यभरातील विविध भागातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन गळती व इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागून रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याला अनुसरून अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्या निर्देशाला अनुसरून असे ऑडिट झाले का, झाले असल्यास ते जनतेसाठी प्रसिद्ध करावे, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्यात शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन वायू नलिकांची, प्रणालीची तपासणी, फायर व स्ट्रक्चरल, सर्व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यासाठी सर्वत्र समिती गठित करण्यात आल्या होत्या. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समिती गठित झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय वगळता अन्य ठिकाणच्या ऑडिटबाबत काय झाले, असे ऑडिट झाले असल्यास त्याची माहिती जनतेला मिळावी, अशी मागणी जनतेच्यावतीने समविचारी मंच प्रमुख बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, श्रीनिवास दळवी, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे, मंदार लेले, राजाराम गावडे, अनिकेत खैर, आविष्कार नांदगावकर, अमोल सावंत, गंधाली सुर्वे, आदींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यभरात या समिती गठित झाल्या. त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिनस्त शासकीय स्तरावर समिती गठित करण्याचे धोरण अवलंबून रुग्णालयांची तपासणी करुन माहिती मिळवली. त्यातील तातडीने करावयाची सुचवलेली दुरुस्ती त्वरित करण्यावर भर दिला. अशाच स्वरुपात रत्नागिरी जिल्ह्यात ऑडिट झाले असल्यास गठित समितीचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी समविचारीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Publish Oxygen, Fire, Electrical Audit Reports in Government and Private Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.