Ratnagiri: मुलीचे अश्लील व्हिडिओ बनविणारा पुण्याचा तरुण सापडला

By अरुण आडिवरेकर | Published: July 13, 2024 01:30 PM2024-07-13T13:30:33+5:302024-07-13T13:31:06+5:30

रत्नागिरी : मुलीला वारंवार मेसेज पाठवून, व्हिडिओ करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. ...

Pune youth who made obscene video of girl found | Ratnagiri: मुलीचे अश्लील व्हिडिओ बनविणारा पुण्याचा तरुण सापडला

Ratnagiri: मुलीचे अश्लील व्हिडिओ बनविणारा पुण्याचा तरुण सापडला

रत्नागिरी : मुलीला वारंवार मेसेज पाठवून, व्हिडिओ करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दशरथ सिद्धराम गायकवाड उर्फ वनराज आश्विन देशमुख (३२, रा. संतोष नगर, पाण्याचे टाकीजवळ, शनिमंदिर समोर, पुणे) असे तरुणाचे नाव आहे.

दशरथ गायकवाड हा मुलीला सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या अकाउंटवरुन चॅटींग करत हाेता. तसेच मुलीला वारंवार व्हिडिओ कॉल करुन तिचे अश्लील अवस्थेतील फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारीत करुन, तसेच अनेकांना पाठवून बदनामी करत हाेता. त्याने मुलीला, तिचे वडील व भावाला शिवीगाळही केली हाेती.

याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी (७ जुलै) भारतीय न्याय संहिता ५००, ५०४, ५०६ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (इ), ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ताे फरार हाेता. त्याचा शाेध सुरु असतानाच ताे मुंबईतील चेंबूर येथील देवनार परिसरात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.

त्यानंतर पाेलिसांनी त्याचा शाेध घेऊन त्याला चेंबूर येथून अटक केली आहे. त्याने या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. त्याचा मोबाइल पाेलिसांनी जप्त केला आहे. तसेच त्याने इतर मुलींशीही सोशल मीडियावर चॅटींग तसेच व्हिडिओ कॉल करुन अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पाेलिस निरीक्षक नितीन ढेरे, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल वैभव मोरे, भैरवनाथ सवाईराम, मंदार मोहिते, उमेश गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Pune youth who made obscene video of girl found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.