दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:47 AM2020-12-29T11:47:40+5:302020-12-29T11:52:41+5:30

TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Punitive action against 3619 riders only for shaving their hair | दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाईदुचाकीला आरसा बंधनकारक, दुचाकीस्वारांना नियमांचा विसर

रत्नागिरी : सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

बाजू काढून पुढे जाताना किंवा वळताना सुरक्षिततेसाठी दुचाकींना दोन्ही बाजुला आरसा लावणे परिवहन विभागाकडून सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे बरेच दुचाकीस्वारांचे दुर्लक्ष होत असते. आरसा लावलेला नसल्याने बाजू काढून जाताना किंवा वळताना मागून आलेले वाहन न दिसल्याने दुचाकीवर मागून आलेले वाहन आपटल्याने अनेक गंभीर आजार झाले आहेत. त्यामुळे दुचाकींवर सक्तीने आरसे बसविण्याचा नियम करण्यात आला आहे. परंतु दुचाकीस्वारांना या नियमांचाच विसर पडला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवाइई राबविली. जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेत तब्बल ३९१९ स्वारांच्या दुचाकीला आरसेच नसल्याचे दिसून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना वाहनचालक आणि इतर जनता यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. मात्र, वाहनचालकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

आरसा नाही म्हणून २०० रुपये दंड

वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, म्हणून वाहतूक शाखेकडून मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत दुचाकींना आरसे नसलेल्या ३,६१९ स्वारांकडून २०० रूपयांप्रमाणे ७,२३,८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

दुचाकीचालकांना हे बंधनकारक

दुचाकी स्वारांसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान हेल्मेट सक्तीचे आहे. याचबरोबर प्रदुषणमुक्त प्रमाणपत्र, गाडीचा विमा, आर. सी. बुक तसेच अन्य गाडीची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

वाहतुकीचे नियम हे वाहन चालक आणि नागरिकांंच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मार्गांवर अपघात होताना दिसतात. दुचाकीस्वार हेल्मेट, आरसा याचा वापर करीत नसल्यानेही अनेक गंभीर अपघात झाले असून त्यात प्रसंगी दुचाकीस्वारांना प्राण गमवावा लागला आहे. आपल्याच सुरक्षिततेची काळजी या स्वारांनी घेतली तर पोलीसांना कायद्याचा बडगा उगारावा लागणार नाही. त्यामुळे अपघातही कमी होतील.
- शिरीष सासने,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

Web Title: Punitive action against 3619 riders only for shaving their hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.