पूर्णगडात एकाच कुटुंबातील १३ जण पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:01+5:302021-06-09T04:39:01+5:30
पावस : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे एकाच कुटुंबातील तेराजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पावस पंचक्रोशीमध्ये काही ...
पावस : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे एकाच कुटुंबातील तेराजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पावस पंचक्रोशीमध्ये काही दिवसांमध्ये विवाहसोहळे पार पडले हाेते. त्यामुळेच या भागात काेराेनाची रुग्णसंख्या वाढत आहे. गावखडीमध्ये आत्तापर्यंत १४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यापैकी ७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर आठजणांचा मृत्यू झाला आहे.
पूर्णगडमध्ये २७ जणांच्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील १३ जणांचा समावेश आहे तसेच दोघांची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना उपचाराकरिता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबराेबर कुर्धे येथील काहीजणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्याचे अहवाल येणे बाकी आहे.
गावखडीपाठाेपाठ पूर्णगड परिसरातही काेराेनाचे रुग्ण आढळल्याने गावात संचारबंदी करण्यात आली आहे. गावातील सीमा बंद करण्यात आल्या असून, ग्रामपंचायतीने कठाेर पावले उचलली आहेत. ग्रामीण भागात लाेकांकडून काेराेनाला गांभीर्याने घेतले जात नसल्याने काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगितले जात आहे.