गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग

By शोभना कांबळे | Published: October 8, 2022 05:17 PM2022-10-08T17:17:13+5:302022-10-08T17:17:39+5:30

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच योगाचा समावेश

Purva Kinre and Prati Kinre participate in the 36th National Games in Ahmedabad Gujarat | गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग

गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग

googlenewsNext

रत्नागिरी : अहमदाबाद (गुजरात) येथे सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धोसाठी येथील पूर्वा किनरे आणि प्राप्ती किनरे यांचा सहभाग आहे. शासनाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच योगाचा समावेश झाला असून किनरे भगिनी या स्पर्धत सहभागी होणाऱ्या जिल्हयातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.      

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद येथे ७ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. १२ ऑक्टोबरपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत. या स्पर्धत यंदा प्रथमच योगासन या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धसाठी रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयातील योग प्रशिक्षण केंद्राच्या योगपटू पूर्वा किनरे आणि प्राप्ती किनरे यांची निवड झाली आहे. जिल्हयातून निवड झालेल्या त्या एकमेव खेळाडू आहेत. गेली दहा वर्षे त्या जिल्हा क्रीडा कार्यालयाचे योग प्रशिक्षक रवि भूषण कुमठेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.

तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित, नितीन तारळकर, चंद्रदीप शिंदे, क्रीडाशिक्षक विनोद मयेकर, राजेश आयरे, किरण जोशी, श्रध्दा जोशी यांनी या दोघींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पूर्वा आणि प्राप्ती किनरे या भगिनी योगाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी आजवर विविध राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील स्पर्धमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. राष्ट्रीय शालेय स्पर्धत पूर्वाने ६ वेळा तर प्राप्तीने ५ वेळा सुवर्ण आणि रौप्यपदके पटकावली आहेत. पूर्वा हिने फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात तीन रौप्यपदके मिळवली आहेत. भारत योगसम्राज्ञी, मिस योगिनी हे पुरस्कारही तिने मिळविले आहेत.

Web Title: Purva Kinre and Prati Kinre participate in the 36th National Games in Ahmedabad Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.