रा. स्व. संघाकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:51+5:302021-08-19T04:34:51+5:30
राजापूर : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने तालुक्यातील माैजे मूर सुतारवाडी या गावात राहणारे प्रसाद शंकर सुतार यांनी शाडूच्या मातीपासून ...
राजापूर : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने तालुक्यातील माैजे मूर सुतारवाडी या गावात राहणारे प्रसाद शंकर सुतार यांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या ६० ते ७० गणेशमूर्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने, राष्ट्रीय स्वयंसवेक संघ जनकल्याण समितीच्या दक्षिण रत्नागिरीतर्फे वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
नंदू कदम यांचा सत्कार
चिपळूण : तालुक्यातील दोणवलीचे सुपुत्र व महावितरण कंपनीच्या खेड उपकेंद्राचे प्रधान यंत्र चालक नंदू कदम यांची कंपनीने उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल महावितरण कंपनीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
विलगीकरणाची मागणी
रत्नागिरी : कोरोनाची साैम्य लक्षणे असलेल्या व्यक्तीला स्वत:ची काळजी घेणे शक्य होईल, असे विलगीकरण कक्ष प्रत्येक गावपातळीवर उभारणे गरजेचे आहे, असे मत जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.महेश मोरताडे यांनी व्यक्त केले. खालगाव येथे नव्याने स्थापन केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.
श्रवणयंत्रे प्रदान
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै.केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.संघमित्रा फुले, श्रवणतज्ज्ञ डाॅ.इजार मुजावर उपस्थित होते.