रफिउद्दीन कास्कर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:54+5:302021-06-09T04:38:54+5:30
चिपळूण : पाग - कास्करवाडी भागातील रफिउद्दीन अ़. वहाब कास्कर (७४) यांचे ६ जून राेजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...
चिपळूण : पाग - कास्करवाडी भागातील रफिउद्दीन अ़. वहाब कास्कर (७४) यांचे ६ जून राेजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांचे संस्थेला सहकार्य मिळत होते. त्यांच्या पश्चात दाेन मुली, भाऊ, बहीण, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
तात्या शेट्ये
राजापूर : शहरातील हार्डवेअर व्यावसायिक व आंबा बागायतदार चंद्रशेखर धाेंडू तथा तात्या शेट्ये (६५) यांचे रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना निधन झाले. ते उत्कृष्ट कॅरमपटू म्हणून परिचित हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई असा परिवार आहे.
मनाेहर कानडे
खेड : येथील किराणा मालाचे व्यापारी, कानडे बाजारचे मालक मनाेहर महादेव कानडे (७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सीताराम जाधव
चिपळूण : चिपळूण तालुका बाैद्धजन पंचायत समितीचे माजी तालुकाध्यक्ष, निवृत्त मुख्याध्यापक सीताराम राघाे जाधव (८२) यांचे निधन झाले. निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झाेकून दिले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
भाग्यश्री धामापूरकर
राजापूर : तालुक्यातील साेलगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य व पत्रकार भास्कर धामापूरकर यांच्या पत्नी भाग्यश्री धामापूरकर (४०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेले काही महिने त्या आजाराने त्रस्त हाेत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, दाेन मुलगे असा परिवार आहे.
भाई सामंत
पावस : स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिर, पावसचे माजी प्राचार्य विश्वास उर्फ भाई सामंत (८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ग्रामसुधारक सेवा समितीचे आधारस्तंभ हाेते. त्यांच्या पश्चात दाेन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रभाकर बाेरवणकर
गुहागर : मूळचे राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथील रहिवासी परंतु गेली ३५ वर्षे नाेकरीनिमित्त गुहागरात वास्तव्याला असणारे भजनीबुवा प्रभाकर रघुनाथ बाेरवणकर (६८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते उत्कृष्ट तबलावादकही हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.