पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:21+5:302021-06-06T04:23:21+5:30
माकडांचा उपद्रव देवरूख : आंबे, काजू, फणसाचा हंगाम संपला असून बागायतीतील खाद्य संपल्याने माकडांनी आता मोर्चा नागरी वस्तीकडे वळविला ...
माकडांचा उपद्रव
देवरूख : आंबे, काजू, फणसाचा हंगाम संपला असून बागायतीतील खाद्य संपल्याने माकडांनी आता मोर्चा नागरी वस्तीकडे वळविला आहे. कौले फोडून माकडे घरात शिरून शिजवलेले पदार्थ, अन्नधान्यांची नासाडी करीत आहेत. एका घरावरून दुसऱ्या घरावर कळपाने उड्या मारीत असल्याने कौले तुटून आर्थिक नुकसान होत आहे.
झाडांची खरेदी सुरू
रत्नागिरी : मृग नक्षत्रात वृक्ष लागवड करण्यात येते. त्यासाठी आंबा, काजू, नारळ, पोफळी, मसाल्याची रोपे, चिकू, पेरूची झाडे खरेदी करण्यात येत आहेत. शासकीय तसेच खासगी नर्सरीतून झाडांची विक्री सुरू असून शेतकरी झाडे पारखून खरेदी करण्यात येत आहेत.
रस्ता निकृष्ट
रत्नागिरी : शहरातील मजगाव रोड ते आझादनगर परिसरातील अंतर्गत रस्ता निकृष्ट झाला आहे. परिसरात पाण्याच्या वाहिनीसाठी केलेले खोदकाम व्यवस्थित न बुजविता ठेकेदाराने तसेच सोडले असल्याने रस्ता बाद झाला असून वाहने चालविणे अवघड बनले आहे.
चिरेखाणी बंदिस्त कराव्या
रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जांभ्या दगडाच्या चिरेखाणी आहेत. मात्र, या चिरेखाणी बाजूने उघड्या असल्याने धोकादायक बनल्या आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने धोका अधिक वाढत आहे. निवळी, हातखंबा, संगमेश्वर, देवरूख भागात अशा चिरेखाणी असून त्या बंदिस्त करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.