रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:37 PM2022-07-13T19:37:20+5:302022-07-13T19:39:31+5:30

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस

Rain in Ratnagiri district, disrupting public life | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत

googlenewsNext

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील जुवाड भागातील एकूण १३ कुटुंबातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी, नातेवाईक यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे.

तसेच दापोली तालुक्यात दुपारी दाभोळ येथील अमीरखान वजीरखान प्रभुलकर यांचे घराचे पडवी वर वाऱ्यामुळे माडाचे झाड पडून पडवीचे २८,०५० रुपयांचे नुकसान झाले आहे. आगरवायंगणी येथील शांताराम शंकर टेमकर यांचे जुन्या घराच्या कौलांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले, या घरात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली.

मौजे उक्षी येथील सीताराम बाळ लिंग गुरव व दत्ताराम बाळ लिंग गुरव ह्यांच्या घराचं अतिवृष्टीमुळे घराचं चौथरा खचला असून, भिंतीना तडे गेले आहेत. कुटुंबात एकूण ५ सदस्य असून, स्थलांतर आवश्यक होते म्हणून शेजारी असलेले सुनंदा सावंत ह्यांच्या घरात राहण्याची सोय केली.

मौजे पेंडखळे येथील शंकर राम चव्हाण व तुकाराम राम चव्हाण यांचे अतिवृष्टीमुळे व वादळामुळे घराचे पत्रे पूर्णतः उडून गेले आहेत. मौजे नायशी वारा पावसाने जयश्री रघुनाथ कोतवडेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे असुर्डे - कासारवाडी येथील विलास भार्गव नरोटे यांचे घराचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झाले आहे.

श्रीपत भिकु खेतले मुंढेतर्फ चिपळूण यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. तसेच पूर्व हसरेवाडी कोलकेवाडी येथील विष्णू धूधाजी कदम, गणपत रामा बंगाल यांच्या घराचा संरक्षण बांध कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे.

दापोली तालुक्यातील आसूद येथे छाया सूर्यवंदन मोरे यांचे घराचे पडविचे पावसाने कोसळून अंशतः नुकसान झाले आहे, कोणीही जखमी नाही. कुंभवे येथील शशिकांत बाबू झाडेकर यांचे घराचे पडवीवर शिवणचे झाड पडून नुकसान झाले. अबिदा अब्दल्ला हवा (रा. जामगे) याच्या घराच्या पडवीवर झाड पडल्याने पडवीचे नुकसान झाले आहे.

Web Title: Rain in Ratnagiri district, disrupting public life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.