पावसाचा व्यत्यय तरीही उत्साह कायम
By admin | Published: March 2, 2015 10:13 PM2015-03-02T22:13:39+5:302015-03-03T00:29:48+5:30
चिपळूणचे सांस्कृतिक केंद्र : वेस मारुती मंदिरात रंगली काव्यसंध्या
चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, चिपळूण व ‘आम्ही चिपळूणकर’तर्फे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरु व्हावे म्हणून लोकचळवळ सुरु आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारावरील काव्यसंध्या कार्यक्रमात पावसाने व्यत्यय आणला. मात्र, हा कार्यक्रम नजीकच्या वेस मारुती मंदिरात रंगला.
या कार्यक्रमात संजीव अणेराव, राजन इंदुलकर, रमाकांत सकपाळ, राजू जाधव, अरुण इंगवले, मच्छिंद्रनाथ वाटेकर, श्रीराम दुर्गे, मुजफ्फर सय्यद, जाफर गोठे, ऋजुता खरे, वेदिका पडवळ, नीला वरवाटकर, माया गोदाडे, कुमार कोवळे, संतोष पुरोहित, शिवाजी शिंदे, सुनीता गांधी, प्रताप गजमल, बाळकृष्ण चव्हाण, प्रकाश सरस्वती गणपत, सुनील खेडेकर आदी उपस्थित होते.
सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पारावरील काव्यसंध्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ढग दाटून आले होते, अशा परिस्थितीतही हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमामध्ये आर्या चौगुले, संदीप परुळेकर, स्मिता गवाळे, रवींद्र गुरव आदींसह विविध कवींनी या मंदिरात रंगलेल्या कार्यक्रमात आपल्या कविता सादर केल्या. चिपळूण शहरातील या एकमेव सांस्कृतिक केंद्राबाबत गेले अनेक महिने वेगवेगळ््या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. मात्र या प्रयत्नाना यश अलेले दिसत नसल्याने हे केंद्र नव्याने प्रयोगासाठी सिध्द व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी चिपळुणातील अनेक संस्थांनी यापूर्वी प्रयत्न केले आता आम्ही चिपळूणकर या सामाजिक संस्थेने अशा कार्यासाठी वेगवेगळ््या कार्यक्रमातून जागृती आणण्याची पावले उचलली आहेत. पारावरची काव्यसंध्या या कार्यक्रमातून सांस्कृतिक केंद्राच्या सुधारणांसाठी पुढाकार घेतला गेला आहे.
शहरातील अनेक मंडळी एकत्र येऊन उभी राहिलेली असल्याने आता नव्या उपक्रमशिलतेतून तरी प्रसासनाला जाग येईल का असा प्रश्न शहरवासिय प्रशासनाला विचारीत आहेत. (वार्ताहर)
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ९ वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. दि. ८ फेब्रुवारी रोजी आम्ही सारे चिपळूणकर यांच्यातर्फे हे केंद्र सुरु व्हावे, यासाठी लोकोत्सव कार्यक्रम झाला. ही लोकचळवळ पुढे चालूच राहावी व सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीला चालना मिळावी, यासाठी रविवारी सायंकाळी पारावरची काव्यसंध्या कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने पुढील कार्यक्रम नजीकच्या वेस मारुती मंदिरात घेण्यात आला. सायंकाळपर्यंत हा कार्यक्रम सुरु होता.