पावसाने कोकणला हसवले...

By admin | Published: July 16, 2014 01:04 AM2014-07-16T01:04:13+5:302014-07-16T01:04:33+5:30

राज्याला रडवले : तुलनेत कोकणात समाधानकारक पाऊस

Rain loses the Konkan ... | पावसाने कोकणला हसवले...

पावसाने कोकणला हसवले...

Next

 रत्नागिरी : जुलै महिन्यात संततधार पडणाऱ्या पावसाने कोकणवर कृपादृष्टी दाखविली असली तरी राज्याच्या उर्वरित भागावर मात्र वक्रदृष्टी दाखविली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील चार जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमधील पावसाने तीन अंकी आकडाही गाठलेला नाही. त्यामुळे कोकण वगळता राज्याच्या अन्य भागांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे.
जून महिन्याच्या मध्यानंतर पूर्णपणे गायब झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच पुन्हा अवतरला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तर कोकणातील अनेक भागात रात्रंदिवस पाऊस बरसू लागला. त्यामुळे खोळंबलेली व यंदा उशिराने सुरू झालेली शेतीची कामे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली. १ जुलैपासून बरसणाऱ्या पावसाने विश्रांती न घेता कोकणवर कृ पादृष्टी दाखविली आहे. कोकणात जुलै महिन्यात आजपर्यंत समाधानकारक पाऊस पडला आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात आजपर्यंत ४६३.९ मिलीमीटर, रायगडमध्ये ५३३.४ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ५८१.० मि.मी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशी, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांनी तर २५० पेक्षाही कमी मि.मी. पाऊस अनुभवला आहे. राज्याच्या अन्य भागात तर पावसाने तीन अंकी संख्याही गाठलेली नाही. कोकणावर कृपादृष्टी करणारा हा पाऊस राज्याच्या अन्य भागावर मात्र रुसला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rain loses the Konkan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.