पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला, आता तब्येत सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:12+5:302021-08-26T04:33:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात जवळपास सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतली आहे. एक दोन आठवड्यात पावसाळी वातावरण असल्याने काहीसा ...

The rain stopped, the heat subsided, now get well! | पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला, आता तब्येत सांभाळा!

पाऊस थांबला, उन्हाचा चटका वाढला, आता तब्येत सांभाळा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात जवळपास सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतली आहे. एक दोन आठवड्यात पावसाळी वातावरण असल्याने काहीसा गारवा होता. परंतु गेल्या तीन-चार दिवसांत अचानक पाऊस थांबला असून कडाक्याच्या उन्हाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे तापसरी, पडसे, डोकेदुखी, सर्दी-खोकला हे विकार बळावू लागले आहेत.

यंदा पाऊस अधिक पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार पावसाचा प्रवास तसा होऊ लागला होता. १६ मे रोजी झालेल्या ताैक्ते वादळाच्या प्रभावाने १ जूनपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलै महिन्यातही पावसाने अतिवृष्टी धरली. त्यामुळे या महिन्यात १८१५ मिलीमीटर इतका पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा प्रमाण कमी झाले.

ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस

- रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलीमीटर पाऊस पडतो.

- जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलीमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते.

- ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, यंदा २५ ऑगस्टपर्यंत केवळ ३६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

वातावरण बदलले काळजी घ्या...

- जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यात पाऊस अधिक पडतो.

- यंदा जून आणि जुलै महिन्यातील सरासरी पावसाने ओलांडली. २० ते २४ जुलै या कालावधीत झालेल्या पावसाने अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण केली.

- ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अधिकच कमी होऊ लागले आहे.

- गेल्या चार दिवसांत तर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. अचानक वातावरण बदलले आहे.

- आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून कोरोना काळात तापसरी, सर्दी खोकला, डोकेदुखी हेही आजार वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: The rain stopped, the heat subsided, now get well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.