विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:52+5:302021-05-05T04:52:52+5:30

रत्नागिरी : कोकणासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. दि. ४ ते ...

Rain warning with thunderstorms | विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Next

रत्नागिरी : कोकणासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. दि. ४ ते दि. ८ मे दरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

दि. ४ मे रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि. ५ मे रोजी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. ६ मे रोजी मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. ७ मे रोजी मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दि. ८ मे रोजी मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणात व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. वादळी वाऱ्याचा अंदाज घेत, फळधारणेवर असलेली पिके व भाजीपाला पिके याना बांबू किंवा काठीचा आधार देऊन दोरीच्या साहाय्याने झाडे एकमेकांना बांधून ठेवत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Rain warning with thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.