Ratnagiri- चिपळुणातील पूर्वविभागात गारांसह पाऊस, टेरव भागात ७ घरांचे नुकसान; आंबा पीक धोक्यात
By संदीप बांद्रे | Published: April 13, 2023 07:04 PM2023-04-13T19:04:31+5:302023-04-13T19:04:51+5:30
उष्माने लाहालाही झालेल्या नागरिकांना दिलासा
चिपळूण : एकीकडे कडाक्याच्या उष्माने अंगातून घामाच्या धारा निघत असतानाच गुरूवारी (१३ एप्रिल) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमाराला चिपळूण तालुक्यातील पूर्वविभागात गारांसह पाऊस कोसळला. केवळ पाच मिनिटे कोसळलेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला हाेता. मात्र, पावसामुळे आंबा पीक धाेक्यात आले आहे.
गेले काही दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. दिवसभर कमालीचा उष्मा वाढला आहे, तर पहाटेच्या वेळी वातावरण काहीसे थंड असते. गेल्या आठवड्यात दाेन दिवस तालुक्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात कोसळलेल्या पावसाने टेरव भागात ७ घरांचे नुकसान झाले होते. तर गुरूवारी तालुक्यातील पूर्वविभागातील अलोरे, शिरगाव परिसरात सायंकाळी ४ वाजता गारांसह पावसाने हजेरी लावली हाेती.
गारा जमा करण्यासाठी चिमुकल्यांसह अनेकांची धावपळ उडाली. मात्र, यावेळी ना वारा, ना ढगांचा कडकडाट अशावेळी अचानकपणे गारांसह कोसळलेल्या पावसाने सर्वांची धावपळ उडाली.