पावसाने जिल्ह्यात किरकोळ पडझडीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:52+5:302021-06-05T04:23:52+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी पडझडीला प्रारंभ झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १२.९० ...
रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी पडझडीला प्रारंभ झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १२.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून ४ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दापोली तालुक्यात दाभोळे येथे सीता यशवंत पालशेतकर यांच्या घराशेजारी अचानक दरड कोसळल्याने ज्योती जितेंद्र पालशेतकर (४१) या किरकोळ जखमी झाल्या. गुहागर तालुक्यात बंदरवाडी येथे सुमती नारायण पावळे यांच्या घरासमोरील ग्रामपंचायत कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने सुमती नारायण पावळे (७०), सायली पालशेतकर (२४) आणि आदिती पालशेतकर (४५) या किरकोळ जखमी झाल्या आहेत. जिल्ह्यात अजूनही काही दिवस वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.