पावसाळ्यातही खेंड भागात टंचाई

By admin | Published: July 22, 2014 10:45 PM2014-07-22T22:45:29+5:302014-07-22T22:49:15+5:30

पाणी रे पाणी : २४ सदनिकाधारकांची वणवण

In the rainy season the scarcity in the region | पावसाळ्यातही खेंड भागात टंचाई

पावसाळ्यातही खेंड भागात टंचाई

Next

चिपळूण : सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी शहरातील खेंड परिसरात असणाऱ्या एका सदनिकेमधील २४ कुटुंबीयांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे प्रश्न मांडूनही गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे या सदनिकेतील रहिवाशांनी पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील खेंड भागात सिल्व्हर पॅलेस सदनिकेत २४ कुटुंबीय राहात आहेत. एप्रिल महिन्यापासून या सदनिकेतील रहिवाशांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत येथील महिलांनी नगरपरिषदेवरही धडक देऊन पाणी समस्या सोडविण्याबाबत प्रशासनाला विनंती केली. मात्र, पावसाळा सुरु झाला तरी येथील सदनिकाधारकांची पाणी समस्या सुटलेली नाही. याबाबत आज (मंगळवारी) येथील काही नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रफीक सुर्वे यांची भेट घेतली व चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने अखेर येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांची भेट घेऊन पाणी समस्येचा प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले.
सदनिकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने दैनंदिन व्यवहार कसे करायचे, असा सवालही रहिवाशांंनी केला. सुधारित नळपाणी योजना सुरु झाल्यानंतर या भागातील पाणी समस्या सुटेल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष शाह यांनी दिले. मात्र, तोपर्यंत सध्या या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. खेंड भागातील पाणी टंचाई तीव्र रूप धारण करीत असल्याने येथील सदनिकाधारकांनी गेले अनेक दिवस पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी प्रयत्न चालविले होते मात्र त्या प्रयत्नाना यश आलेले नाही.
शहरातील मोठ्या लोकवस्तीच्या भागाला पाणी टंर्चािला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नाराजीवर उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनी लियाकत शहा यांची भेट घेतली व त्याच्याकडून शब्द घेतल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)

-चिपळूण शहरातील विकसित होत असलेला भाग म्हणून खेंड भागाकडे पाहिले जात आहे. येथे असणाऱ्या नागरी सुविधांकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेले तीन महिने यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य पालिकेने दाखविले नाही, पाणी पुरवठा विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चिपळूण नगरपालिकेच्या पाणी विभागाकडे २४ सदनिकाधारकांनी आजपर्यंत अनेक वेळा संपर्क साधला व पाणीपुरवठ्यातील व्यत्ययाबाबत गाऱ्हाणे मांडले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. शहरातील खेंड भागात नागरिकांनी पावसात पाण्यासाठी वणवण करणे, हे क्लेषदायक असल्याची प्रतिक्रिया तेथून व्यक्त करण्यात आली.

Web Title: In the rainy season the scarcity in the region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.