राज ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेला अखेर मैदान मिळालं, 'याठिकाणी' होणार सभा 

By अरुण आडिवरेकर | Published: April 21, 2023 03:42 PM2023-04-21T15:42:17+5:302023-04-21T15:42:37+5:30

राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने दिला नकार

Raj Thackeray meeting in Ratnagiri finally got a ground, The meeting will be held at Pramed Mahajan Sports Complex | राज ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेला अखेर मैदान मिळालं, 'याठिकाणी' होणार सभा 

राज ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेला अखेर मैदान मिळालं, 'याठिकाणी' होणार सभा 

googlenewsNext

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान निश्चित करण्यात आले हाेते. मात्र, राजकीय सभांना संस्था मैदानात देत नसल्याने मनसेला दुसरे मैदान शाेधावे लागले. या पार्श्वभूमीवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कै. प्रमाेद महाजन क्रीडा संकुलाची पाहणी करून हे ठिकाणी सभेसाठी निश्चित केले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी शहरातील गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान निश्चित करण्यात आले हाेते. त्याअनुषंगाने मनसे नेते नितीन सरदेसाई शुक्रवारी (२१ एप्रिल) रत्नागिरीच्या दाैऱ्यावर आले हाेते. त्यांनी सभेच्या पार्श्वभूमीवर जवाहर मैदानाची पाहणी केली. शैक्षणिक संस्था असल्याने राजकीय सभांसाठी मैदान कोणालाही देत नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. गेली दहा वर्षे कोणत्याही राजकीय पक्षाला हे मैदान सभेसाठी देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच सभेसाठी संस्थेकडे मनसेकडून अधिकृत कोणी आलेच नसल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेसाठी दुसरी जागा शाेधण्याची वेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी आठवडा बाजार येथील कै. प्रमाेद महाजन क्रीडा संकुलाची जागा निश्चित केली आहे. या जागेची नितीन सरदेसाई आणि पदाधिकाऱ्यांनी पाहणीही केली. त्यामुळे राज ठाकरे यांची रत्नागिरीत ६ मे राेजी हाेणारी सभा जवाहर मैदानात हाेणार नसून कै. प्रमाेद महाजन क्रीडा संकुलात हाेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Web Title: Raj Thackeray meeting in Ratnagiri finally got a ground, The meeting will be held at Pramed Mahajan Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.