मरेपर्यंत 'याच' मतदार संघासाठी काम करणार, राजन साळवींची स्पष्ट भूमिका

By मनोज मुळ्ये | Published: April 15, 2023 12:04 PM2023-04-15T12:04:47+5:302023-04-15T12:09:35+5:30

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

Rajan Salvi clear role will work for rajapur constituency till death, ratnagiti | मरेपर्यंत 'याच' मतदार संघासाठी काम करणार, राजन साळवींची स्पष्ट भूमिका

मरेपर्यंत 'याच' मतदार संघासाठी काम करणार, राजन साळवींची स्पष्ट भूमिका

googlenewsNext

रत्नागिरी : ज्यावेळी मी राजापूर - लांजा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, त्याचवेळी मी शपथ घेतली होती की जिंकलो किंवा हरलो तरी मरेपर्यंत याच मतदार संघासाठी कार्यरत राहीन. त्यामुळे मी अन्य कोणत्या मतदार संघातून लढण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. रत्नागिरी ही आपली जन्मभूमी आहे. शिवसेनेमुळे आपल्याला नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. 

२००६ साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपण राजापुरातून प्रथम निवडणूक लढवली. त्याचवेळी आपण तिथल्या मातीची शपथ घेतली आहे. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पण खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून काम सुरू ठेवले. त्यामुळेच २००९, २०१४ आणि २०१९ ला मतदारांनी मला निवडून दिले. आता मतदार संघ बदलण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

पक्षाने आदेश दिल्यास जबाबदारी घेणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, पक्षादेशाला मी बांधिल आहे. पण जिथे मी आतापर्यंत निवडणूक जिंकलो आहे, जिथे मतदारांना जिंकले आहे, जिथे मी पक्ष वाढवला आहे, तिथेच मला पक्षप्रमुख संधी देतील, याबाबत मला विश्वास आहे. देशातील तपास यंत्रणांचा कितीही वापर झाला तरी महाविकास आघाडी त्याला बधणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

Web Title: Rajan Salvi clear role will work for rajapur constituency till death, ratnagiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.