राजन साळवी यांनी केले साटवली आरोग्य केंद्राचे काैतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:38+5:302021-07-22T04:20:38+5:30
रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या मतदार संघातील दुर्गम भागात वसलेले ...
रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या मतदार संघातील दुर्गम भागात वसलेले शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, साटवली (ता. लांजा) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, डॉ. आदिती तावडे यांच्यासह शिपाई, चालक, आशा सेविका अशा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘कोविड योद्धा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविले.
साटवली आरोग्य केंद्राने लसीकरण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या आरोग्यविषयक कामाचा गौरव, प्रेरणा, प्रोत्साहन म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी डॉ. पाखरे यांनी कोरोनामधील चांगली कामगिरी ही सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच शक्य होत आहे, असे आवर्जून सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य दीपाली आंबोळकर, साटवलीचे सरपंच दत्ताराम सावंत आणि शिवसेना कार्यकर्ते या गौरव कार्यक्रमाला उपस्थित होते.