राजन साळवी यांनी घेतला प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:24+5:302021-05-08T04:33:24+5:30
राजापूर : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आमदार राजन साळवी यांनी मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे़ ...
राजापूर : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आमदार राजन साळवी यांनी मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे़ त्या अनुषंगाने जैतापूर व सोलगाव तसेच धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घेण्यात येणाऱ्या उपाययोजना व कोविड लसीकरणाबाबत भेट घेऊन आढावा घेतला़ तसेच ग्रामपंचायत नाटे संचलित सुरू करण्यात आलेल्या फीव्हर क्लिनिकलाही भेट दिली.
या क्लिनिकमध्ये सकाळी १० ते १ या वेळेत डॉ. सुनील राणे व दुपारी ३ ते ५ या वेळेत डॉ. अवधूत झेंडे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. या सुरू केलेल्या फीव्हर क्लिनिकचे आमदार राजन साळवी यांनी कौतुक केले़ या उपक्रमामुळे नाटे गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल, असे ते म्हणाले.
तसेच माजी सभापती अभिजीत तेली यांच्या सेस निधीतून धारतळे व सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला औषधे आणि किट देण्यात आले़ यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासमवेत महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पडवळ, परिचारिका गौरी देवस्थळी, उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, राजन कोंडेकर, उपसभापती उन्नती वाघरे, माजी सभापती अभिजीत तेली, माजी उपसभापती प्रकाश गुरव, पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, नंदकुमार मिरगुळे, मंगेश मांजरेकर, गिरीश कंगुटकर उपस्थित होते.