प्रमोद जठार यांच्याविरोधात राजन साळवी यांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:56+5:302021-08-26T04:33:56+5:30

रत्नागिरी : माजी आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना नारायण राणे यांच्याशी केल्याने असंख्य अनुयायींच्या भावना दुखावल्या ...

Rajan Salvi's complaint against Pramod Jathar | प्रमोद जठार यांच्याविरोधात राजन साळवी यांची तक्रार

प्रमोद जठार यांच्याविरोधात राजन साळवी यांची तक्रार

googlenewsNext

रत्नागिरी : माजी आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना नारायण राणे यांच्याशी केल्याने असंख्य अनुयायींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील वाद आता दिवसेंदिवस टोकाला पोहोचताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यावर आता दोन्ही बाजूंकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल होत आहेत. आमदार राजन साळवी यांनीही अशीच एक तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी केली आहे. नारायण राणे हे फौजदारी केसमध्ये संशयित आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे निंदनीय कृत्य आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले, असे वक्तव्य जठार यांनी २४ ऑगस्टला केले आहे. नारायण राणे हे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे, असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे तुलना केल्याने असंख्य अनुयायी व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. जठार यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे प्रमोद जठार यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी राजन साळवी यांनी या तक्रारीद्वारे केली आहे.

Web Title: Rajan Salvi's complaint against Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.