Rajapur: चारचाकी कॅम्पर धरण क्षेत्रात कोसळून मोठी दुर्घटना, दोन कामगारांचा मृत्यू; आठ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 21:50 IST2023-06-14T21:50:06+5:302023-06-14T21:50:50+5:30
Rajapur: पाचल - करक अर्जुना धरण क्षेत्रात चारचाकी कॅम्पर गाडी उलटून दोन कामगार जागीच ठार झाले. अन्य आठजणा जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

Rajapur: चारचाकी कॅम्पर धरण क्षेत्रात कोसळून मोठी दुर्घटना, दोन कामगारांचा मृत्यू; आठ गंभीर
मनोज मुळ्ये/विनोद पवार -
राजापूर - पाचल - करक अर्जुना धरण क्षेत्रात चारचाकी कॅम्पर गाडी उलटून दोन कामगार जागीच ठार झाले. अन्य आठजणा जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हे कामगार अरगाव अर्जुना कॅनॉलमध्येच काम करतात. बुधवारी १४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते धरणावर फिरायला गेले असताना हा अपघात झाला. हे सर्व कामगार बिहारचे आहेत.
जखमींना ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना आज बुधवार दिनांक 14 जून सायंकाळी 6:30 वाजता घडली आहे. अपघात ग्रस्त वाहनाचा नंबर MH14 - ju1359 असा आहे. या अपघातामध्ये सुदाम कुमार वय 26 बनई वय 25 हे मयत झाले आहेत. तर सूर्यकुमार बिन(बिहार), उकाश कोरे (सांगली), समरपाल कस्य(मुरादाबाद), राहुल गणेशवाडे (मिरज), हिरांकुमार बिन, लहुकुमार बिन, दिपकुमार बिन, मक्सुदन हे आठ जण गंभीर आहेत.
जखमींची भेट घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात राजापूर तहसीलदार शीतल जाधव तात्काळ दाखल झाल्या आहेत. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर उपनिरीक्षक उबाळे यासह पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ दाखल जखमींना सिविल हॉस्पिटल रत्नागिरी येथे रेफर करीत आहेत.