राजापूर नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत कोंग्रेसचे खलिफे विजयी, शिवसेनेचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:39 PM2018-07-16T12:39:36+5:302018-07-16T12:44:24+5:30

राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन १६४२ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. गतनिवडणुकीतील मतांची संख्याही शिवसेनेला राखता आली नाही.

Rajapur Municipal Corporation's election wins Congress Khalifa, defeats Shivsena | राजापूर नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत कोंग्रेसचे खलिफे विजयी, शिवसेनेचा पराभव

राजापूर नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत कोंग्रेसचे खलिफे विजयी, शिवसेनेचा पराभव

googlenewsNext
ठळक मुद्देराजापूर नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत कोंग्रेसचे खलिफे विजयीशिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका

राजापूर : राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन १६४२ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. गतनिवडणुकीतील मतांची संख्याही शिवसेनेला राखता आली नाही.

काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत झाली असली तरी खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच झाला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता या राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला महत्व होते.

काँग्रेस आघाडीकडून प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर आणि भाजपकडून त्यांचे पालिकेतील एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण रिंगणात होते. तिन्ही उमेदवारांनी जोमाने प्रचार केला. शिवसेनेकडून आमदार राजन साळवी आणि काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरली.

आई आणि मुलगा थेट जनतेतून नगराध्यक्ष

या निवडणुकीत हुस्नबानू यांनी बाजी मारली. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही यापूर्वी विद्यमान विधानपरिषदेच्या सदस्या हुस्नबानू खलिफे याही थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. आई आणि मुलगा थेट जनतेतून नगराध्यक्षपदासाठी येण्याचा हा अनोखा विक्रम ठरला.

भाजपमधून बंडखोरी केलेल्या शीतल पटेल यांच्या माघारीनंतर भाजपच्या तंबूतून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला होता, मात्र, उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये जे नाट्य घडले होते, ते पाहता दुभंगलेली मने पुन्हा सांधली गेली नाहीत.

नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे हे मागील एक दशक नगरसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी पालिकेत सभापतीपदे भूषवली आहेत. यावेळी ते उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच नगराध्यक्ष पदाचा अतिरीक्त कार्यभार त्यांच्याकडे होता.

खलिफे यांनी मागील कार्यकालात शहरवासीयांसाठी चांगले योगदान दिले आहे. पाण्याच्या प्रश्नासह रस्ते व अन्य मूलभूत सुविधा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे.

पक्षाचे प्रतोद म्हणूनही ते कार्यरत होते. मागील वेळीही मेळेकर यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. पण, ते पराभूत झाले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन संधी दिली मात्र, त्यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. भाजप उमेदवार गोविंद चव्हाण हे पालिकेतील एकमेव नगरसेवक असून, पाणी सभापती म्हणून कार्यरत होते.


साळवी - खलिफे यांची प्रतिष्ठा लागली होती पणाला

ही निवडणूक शिवसेनेचे आमदार राजन साळवी व काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. राजापूर नगर परिषदेत सतरापैकी शिवसेनेचे सर्वाधिक आठ नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी आमदार साळवी व त्यांच्या सहकाºयांवर होती, मात्र त्यांना त्यात अपयश आले. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. गतनिवडणुकीतील मतांची संख्याही शिवसेनेला राखता आली नाही.

Web Title: Rajapur Municipal Corporation's election wins Congress Khalifa, defeats Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.