साखरपामधील दोन मनोरुग्णांना ‘राजरत्न’चा मायेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:38+5:302021-07-21T04:21:38+5:30
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरातील बेवारस फिरणाऱ्या दोन अनोळखी मनोरुग्णांना राजरत्न प्रतिष्ठानने मायेचा आधार देण्यात आला. साखरपा परिसरात ...
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरातील बेवारस फिरणाऱ्या दोन अनोळखी मनोरुग्णांना राजरत्न प्रतिष्ठानने मायेचा आधार देण्यात आला.
साखरपा परिसरात मागील अनेक वर्षे हे अनोळखी मनोरुग्ण फिरत होते. याची माहिती साखरपा पोलिसांनी या संस्थेला दिली. राजरत्न प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी साखरपा येथे येऊन या रुग्णांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर आंघोळ घालून स्वच्छतापूर्वक ताब्यात घेतले. त्या दोन मनोरुग्णांना पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे दाखल केले. प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष सचिन शिंदे, रूपेश सावंत, छोटू खामकर यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. राजरत्न प्रतिष्ठानने आतापर्यंत १०७ रुग्णांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर २८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन संपूर्ण भारतात त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहेत.
यावेळी साखरपामधील निकिता खामकर, प्रणिता शिंदे, राजन किर यांनीही या कामात मदत केली.
साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार संजय मारळकर यांनीही प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना मदत केली. यावेळी पोलीस नाईक हेमा गोतवडे, वैभव नटे, कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे, भरत माने, पत्रकार संतोष पोटफोडे यांनीही सहकार्य केले.