आत्महत्येसाठी तरुणाने मारली समुद्रात उडी, रत्नागिरीतील राजीवडा भाट्ये येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 14:19 IST2021-12-21T14:18:18+5:302021-12-21T14:19:11+5:30
रत्नागिरी : शहरातील राजीवडा - भाट्ये येथील पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज, ...

आत्महत्येसाठी तरुणाने मारली समुद्रात उडी, रत्नागिरीतील राजीवडा भाट्ये येथील प्रकार
रत्नागिरी : शहरातील राजीवडा - भाट्ये येथील पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, काही तरुणांनी बोटीच्या साह्याने या तरुणाला वाचविले. आफान रऊफ वस्ता, अरमान नजीर होडेकर, सलमान नजीर होडेकर असे या जीव वाचवलेल्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, अतुल अशोक बागडे या तरुणाने १२ वाजता राजीवडा-भाट्ये पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, खाडीत बुडणाऱ्या अतुल याचा राजीवडा येथील तरुणांनी तत्काळ होडी घेऊन जीव वाचवला.
या पुलावरून अनेकांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, बुडणाऱ्या अनेकांचा जीव राजीवडा येथील स्थानिक मच्छीमारांनी वाचविले आहेत. काही महिन्यापूर्वी याच पुलावर गळफास लावून मिऱ्या बंदर येथील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती.