राजापुरात मान्यताप्राप्त एस. टी. कामगार सेना संघटनेत फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:23 PM2018-10-04T16:23:57+5:302018-10-04T16:26:32+5:30
मान्यताप्राप्त संघटनेच्या कारभाराला कंटाळून तसेच रावते यांनी दिलेल्या वेतनवाढीवर विश्वास ठेवून आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजापूर आगारातील अनेक कामगारांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे.
राजापूर : राजापूर आगारातील अनेक कामगारांनी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे. यामधील बहुतांश कर्मचाऱ्यांनी मान्यताप्राप्त संघटनेच्या कारभाराला कंटाळून तसेच अध्यक्ष व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेल्या वेतनवाढीवर विश्वास ठेवून आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत एस. टी. कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेत फूट पडल्याचे समोर आले आहे.
राजापूर आगारातील एस. टी. कामगार संघटनेचे माजी सचिव श्रीपाद कुलकर्णी व इंटकचे दहिफडे यांच्यासह निवास माळी, व्ही. व्ही. पोवार, हुसेन इनामदार, सुनील नाकील, टी. के. पाटील, शीतल पाटील, भास्कर जाधव, आर. एस. भाट, विशाल कोळी, भरत दवडे, व्यंकट घुळे, वाय. बी. आयवाल, डी. वी. देशमुख, एस. एन. घुगे, व्ही. एल. शिरसाट, चंदन शिंदे, एम. पी. हळदंडवरू, एस. बी. हजारे, एन. ए. मुजावर, सचिन पाटील, एस. एन. डोंगरे, एन. एम. जाधव, अमित कदम, इस्माईल मुसारी यांच्यासह अन्य कामगारांनी कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कामगार सेनेचे अनिल कुवेसकर, दिलीप पाटील, प्रकाश झोरे, संतोष गोटम, सत्यवान चव्हाण, पम्या सावंत आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, तालुका सभापती अभिजीत तेली, उपसभापती प्रशांत गावकर, उपतालुका प्रमुख तात्या सरवणकर, विश्वनाथ लाड, राजन कुवळेकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, विभागप्रमुख गणेश तावडे, नरेश दुधवडकर, संतोष हातनकर, राजा काजवे, नरेश शेलार, जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, नगरसेवक विनय गुरव, सौरभ खडपे, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, प्रकाश गुरव, कमलाकर कदम, दशरथ दुधवडकर, सुशांत मराठे, नितेश सावंत, मंदार बावधनकर तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कामगार सेनतील प्रवेशाने राजापूर आगारातील मान्यताप्राप्त संघटनेत मोठी फूट पडली आहे. आता या नवीन प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना असणार आहे, असा इशारा मान्यताप्राप्त संघटनेला देण्यात आला आहे. राजापूर आगार आता लवकरच पूर्णपणे शिवसेनामय होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.