गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राकेश काेटिया बिनविराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:24+5:302021-06-26T04:22:24+5:30

दापाेली : श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा राकेश कोटिया यांची बिनविराेध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत ही ...

Rakesh Katia unopposed as the President of Gopalkrishna Credit Union | गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राकेश काेटिया बिनविराेध

गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राकेश काेटिया बिनविराेध

Next

दापाेली : श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा राकेश कोटिया यांची बिनविराेध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत ही निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी सुधीर तलाठी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कोटिया यांनी २००३ - ०४ साली सहकार क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर २००६ -०७ साली त्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर संचालक, उपाध्यक्ष व थेट अध्यक्ष असा त्यांचा प्रवास सुरू झाला. २००८ ते २०१८ या दरम्यान ते गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत गोपाळकृष्ण पतसंस्थेला माय कोकणचा सहकार पुरस्कार व ए. एस. प्रतिष्ठान, कोल्हापूर यांनी आदर्श चेअरमन पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच काेल्हापूर येथील अविज् प्रकाशनचा प्रथम बॅंको पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

गोपाळकृष्ण पतसंस्थेची सुत्रे पुन्हा राकेश कोटिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक सुधीर कांबळे यांनी काम पाहिले. राकेश काेटिया यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड हाेताच त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

-----------------------------

श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राकेश कोटिया व उपाध्यक्षपदी सुधीर तलाठी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Web Title: Rakesh Katia unopposed as the President of Gopalkrishna Credit Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.