सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:32 AM2022-09-19T09:32:29+5:302022-09-19T09:33:33+5:30

शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Ramdas Kadam criticism on Uddhav Thackeray and aditya in dapoli speech | सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

googlenewsNext

दापोली- 

शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. "सारखं बोलता मी बाळासाहेबांचा मुलगा, बाळासाहेबांचा मुलगा... पण आम्ही कुठं नाही म्हणतोय...संशय आहे का?", अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचंही ते म्हणाले. 

"मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?", अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली. 

सोनियांच्या नादी लागू नका
"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चल तुझ्यासोबत मी आहे असं बाळासाहेब आज वरुन सांगत असतील", असंही रामदास कदम म्हणाले. 

आदित्य ठाकरेंनी आधी लग्न करावं
रामदास कदम यांनी यावेळी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला. "जगातला पहिला प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला. जसा कायदा केला तसं आदित्य टूनटून उड्यामारुन मी केला, मी केला म्हणून ओरडू लागले. अरे तू काय केलं. तू अजून लग्न केलं नाही तू काय करणार आहेस. बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला याला खरी गद्दारी म्हणतात", असं रामदास कदम म्हणाले.

Web Title: Ramdas Kadam criticism on Uddhav Thackeray and aditya in dapoli speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.