रामनवमी शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:07+5:302021-04-23T04:34:07+5:30

मंडणगड : यावर्षीही कोरोनाच्या सावटामुळे रामनवमी साधेपणाने साजरी करावी लागली. मंडणगड शहरासह धुत्रोली, अडखण, कुर्डूक खुर्द या गावांमध्ये दरवर्षी ...

Ramnavami in peace | रामनवमी शांततेत

रामनवमी शांततेत

Next

मंडणगड : यावर्षीही कोरोनाच्या सावटामुळे रामनवमी साधेपणाने साजरी करावी लागली. मंडणगड शहरासह धुत्रोली, अडखण, कुर्डूक खुर्द या गावांमध्ये दरवर्षी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा होतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला.

नियंत्रण कक्षाची स्थापना

रत्नागिरी : कोरोना परिस्थितीमुळे खत बियाणे, कीटकनाशके यांचा काळाबाजार साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या कक्षाचे कामकाज सुरू राहणार आहे.

प्रवासी शेड

खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाजवळ शिवसेनेच्यावतीने प्रवाशांसाठी प्रवासी शेड उभारण्यात आली असून उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तालुक्यातील विविध भागांतून अनेक रुग्ण येत असतात. त्यांना सावली मिळावी या हेतूने ही शेड उभारली गेली आहे.

प्रांतांना निवेदन

दापोली : वाढीव हर्णै प्रादेशिक नळपाणी योजना बांधतिवरे उद्भवातून हर्णै, पाजपंढरी, अडखळ आणि शिवाजीनगर या गावांना १४ वर्षांपासून पाणीपुरवठा करत आहे. मात्र, या उद्भवाशेजारी ५० मीटरवर खासगी योजनेसाठी अवैध उत्खनन सुरू झाले आहे. हे थांबविण्यासाठी वाढीव हर्णै प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुकाणू समितीतर्फे प्रांतांना निवेदन दिले आहे.

विनापरवाना वाहतूक

मंडणगड : तालुक्यातील देव्हारे गोटा या ठिकाणी गेले अनेक महिन्यांपासून रात्रंदिवस विनापरवाना वाहतूक सुरू आहे. शासनाची रॉयल्टी न भरता सक्शन पंपाद्वारे वाळू काढून तिची वाहतूक केली जात आहे. शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत असूनही त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे.

दुकानदारांना दिलासा

रत्नागिरी : सहा दिवस बंद असलेले किराणा मालाची तसेच भाजीची दुकाने गुरुवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू झाली आहेत. त्यामुळे दुकानदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शासन अधिक कडक लॉकडाऊन करेल, ही भीतीही व्यक्त होत आहे.

रक्तदान शिबिर

चिपळूण : संत निरंकारी मंडळाच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने २४ एप्रिल या मानव एकता दिनाचे औचित्य साधून हातखंबा येथे २४ एप्रिलला रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. क्षेत्रिय प्रबंधक गंगाधर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.

उत्सवावर सावट

दापोली : यावर्षी दुसऱ्यांदा रामनवमी उत्सवावर कोरोनाचे सावट राहिल्याने रामभक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या अनुषंगाने सर्व त्या नियमांचे पालन करून दापोली तालुक्यातील श्रीराम मंदिरामध्ये रामनवमी उत्सव साधेपणाने साजरा झाला.

कुशल तंत्रज्ञाची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयासह एकूण सहा ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येत आहेत. मात्र, या यंत्रणेसाठी कुशल तंत्रज्ञ नेमण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचातर्फे बाबा ढोले, श्रीनिवास दळवी, संजय पुनसकर, रघुनंदन भडेकर आदींनी केली आहे.

विद्यार्थी ताणविरहीत

लांजा : कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे सध्या अभ्यासाच्या ओझ्याखाली असलेल्या विद्यार्थ्यांमधून परीक्षेच्या संकटातून सुटल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र, काही विद्यार्थी परीक्षा व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Web Title: Ramnavami in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.