रत्नागिरीत पावसाचं रौद्र रूप, काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 03:15 PM2017-09-19T15:15:00+5:302017-09-19T16:07:24+5:30
रत्नागिरी, दि. 19 - रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार कोसळणा-या पावसाने आज रौद्र रुप धारण केले आहे. अतिवृष्टी आणि ...
रत्नागिरी, दि. 19 - रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार कोसळणा-या पावसाने आज रौद्र रुप धारण केले आहे. अतिवृष्टी आणि खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे तीन बोटी बुडाल्या आहेत. सुदैवाने स्थानिकांच्या सहकार्याने त्या बोटींवरील सर्व खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. पण समुद्रात काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खवळलेल्या समुद्रामुळे आंजर्ले खाडीत तीन बोटी बुडाल्याची घटना आज दुपारी घडली. बोटीवरील 10 जणांना स्थानिकांनी वाचविले आहे. त्याचदरम्यान सुवर्णदुर्ग किल्याशेजारी एक बोट खडकावर आदळून फुटली आहे. सुदैवाने त्यात कोणीही नव्हते. समुद्रात काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. दापोली तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला असून, हर्णेतील बाजार मोहल्यात अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे. अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे 700 मच्छिमार बोटींनी किनारा गाठला आहे.