तळकोकणावरील हक्कासाठी राणे - शिवसेना संघर्ष अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 PM2021-02-13T16:13:53+5:302021-02-13T16:18:08+5:30

Politics Konkan- शिवसेनेला सर्वांत मोठा आधार दिला कोकणाने. त्यातही तळकोकणातील लोकांनी शिवसेनेच्या पदरात भरपूर माप टाकले. त्यामुळे कोकण हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे शिवसेना मानते आणि त्याला सुरुंग लावण्यासाठी आधी काँग्रेसकडून आणि आता भाजपकडून नारायण राणे, नीलेश राणे आणि नीतेश राणे पुढे सरसावले आहेत.

Rane-Shiv Sena struggle for Talakkonam rights is inevitable | तळकोकणावरील हक्कासाठी राणे - शिवसेना संघर्ष अटळ

तळकोकणावरील हक्कासाठी राणे - शिवसेना संघर्ष अटळ

Next
ठळक मुद्देनारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून संघर्षाला सुरूवात भाजपमध्ये गेल्यापासून नीलेश राणे यांचा संघटना वाढीसाठी आक्रमक पुढाकार

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : शिवसेनेला सर्वांत मोठा आधार दिला कोकणाने. त्यातही तळकोकणातील लोकांनी शिवसेनेच्या पदरात भरपूर माप टाकले. त्यामुळे कोकण हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे शिवसेना मानते आणि त्याला सुरुंग लावण्यासाठी आधी काँग्रेसकडून आणि आता भाजपकडून नारायण राणे, नीलेश राणे आणि नीतेश राणे पुढे सरसावले आहेत.

कोकणावर हक्क सांगण्यासाठी या दोन्ही बाजू अशाच आक्रमक होत राहणार हे निश्चित असल्याने ह्यराणे विरुद्ध शिवसेनाह्ण हा संघर्ष पुढील काही काळ कायम राहणे अटळ आहे. नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना फटके देण्याची भाषा केल्यानंतर आता शिवसेनाही फटकेबाजीच्या भाषेतच उत्तर देण्यासाठी पुढे आली आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २००५ साली शिवसेना सोडल्यापासूनच ह्यराणे विरुद्ध शिवसेनाह्ण हा संघर्ष सुरू झाला आहे. तो अपेक्षितच होता. मात्र गेल्या काही काळात हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. २०१४ आणि २०१९ अशा दोन निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांच्यासमोर नीलेश राणे यांचा पराभव झाला. निवडणुकांदरम्यात आरोप-प्रत्यारोप होत होते. शाब्दिक वाद अनेकदा झाले. मात्र त्यावेळीही या संघर्षाची धार इतकी तीव्र झाली नव्हती. आता प्रत्येक विषयातच हा संघर्ष पुढे येत आहे आणि आता तर एकमेकांना फटकावण्याची भाषा जाहीरपणे केली जात आहे. यामागे कोकणचा गड ताब्यात घेणे किंवा ताब्यात ठेवणे हाच प्रमुख मुद्दा असल्याचे लक्षात येत आहे. नजीकचा काही काळ हा संघर्ष असाच राहणेही अटळ असल्याचे दिसत आहे.

काय आहे नेमका वाद?...

सध्या सुरू असलेल्या वादाची ठिणगी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पडली आहे. सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपचे माजी पक्षाध्यक्ष, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हजेरी लावल्याने नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमात अमित शहा यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यावर खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेच; शिवाय नारायण राणे यांच्यासारख्या नॉन-मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद दिले गेले तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुर्दैव असेल, असे विधानही त्यांनी केले. तेथून या वादाला सुरुवात झाली आहे.

ताबा घेण्यासाठी...

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारी मिळाली. मात्र राणे यांचा करिश्मा अजूनही कायम आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता राणे यांना कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. त्याचवेळी शिवसेनेला कोकणावरचे आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे. त्यामुळे या दोन्हीमधील संघर्ष अटळ असल्याचे निश्चित आहे.

आक्रमक शैलीत उत्तर

खासदार राऊत यांच्या या टीकेला माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उत्तर दिले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांचा बंदोबस्त करणार, असे सांगतानाच त्यांनी जर भाषा बदलली नाही तर त्यांना दिसेल तिथे फटकावण्याचा इशाराही दिला आहे. नीलेश राणे यांच्या या टीकेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे या टीकेला रत्नागिरी, सिंधुदुर्गातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे.

खरी लढाई हक्कासाठी

राजकीय लोकांमधील आरोप-प्रत्यारोप ही नवीन गोष्ट नाही; पण राणे विरूद्ध शिवसेना हा वाद नेहमीच चर्चेचा झाला आहे. यात खरी लढाई आहे ती कोकणचा गडावरच्या हक्काची. गेली अनेक वर्षे शिवसेना कोकणात पाय रोवून घट्ट उभी आहे. त्यात नारायण राणे यांचा वाटाही खूप मोठा आहे. १९९० मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली विधानसभा निवडणूक लढवताना नारायण राणे यांनी शिवसेनेला घट्ट पकड मिळवून दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेलाही त्यांनी वेळोवेळी बळ दिले. ते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रस्थ खूप कमी झाले.

Web Title: Rane-Shiv Sena struggle for Talakkonam rights is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.