जिल्ह्यात रंगपंचमी शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:36+5:302021-04-03T04:28:36+5:30
तन्मय दाते फोल्डरला फोटो आहेत. लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे शासकीय निर्बंध असल्याने जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी शांततेत ...
तन्मय दाते फोल्डरला फोटो आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे शासकीय निर्बंध असल्याने जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी शांततेत साजरी करण्यात आली. बच्चे कंपनीने मात्र घराच्या, सोसायटीच्या आवारात रंगपंचमीचा आनंद घेतला. मात्र दरवर्षीप्रमाणे रंगपंचमीचा उत्साह नव्हता. नेहमीप्रमाणे व्यवहार सुरळीत सुरू होते.
गुड फ्रायडेनिमित्त विविध शासकीय कार्यालये, शाळांना सुट्ट्या होत्या. बँका तर गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. खासगी कार्यालये सुरू होती. कोरोनाच्या सावटामुळे रंगपंचमी साजरी करतानाही सावधानता बाळगण्यात आली होती. बच्चे कंपनीसमवेत ज्येष्ठसुद्धा रंगपंचमीमध्ये सहभागी झाले असले तरी कोरड्या रंगाचाच सर्वाधिक वापर करण्यात येत होता.
बच्चे कंपनी पिचकाऱ्या घेऊन एकमेकांना रंगवित होती. मात्र दरवर्षीप्रमाणे नाक्यानाक्यावर, मोठ्या प्रमाणात उडविले जाणारे रंग, पाण्याचे फवारे, छोट्या-मोठ्या वाहनांवर रंगाचे मारले जाणारे रंगाचे फुगे टाळण्यात आले. रंगपंचमीमुळे नाक्यानाक्यावर रंग, पिचकाऱ्या विक्रेत्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. कोरोनामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या दरात रंग, पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. विशेषत: गृहनिर्माण सोसायटी, इमारतीच्या आवारात रंगपंचमी खेळण्यात आली. दवाखाने किंवा औषधांची दुकानासह सर्व व्यवहार सुरू होते. रंगपंचमी खेळल्यानंतर नाश्त्यासाठी वडापाव, सामोसे, वेफर्स, लाडूसारख्या खाद्यपदार्थांना विशेष मागणी होती. ऑर्डरप्रमाणे आधीच ग्राहकांनी खाद्यपदार्थ दुपारीच घरी नेले होते.