रश्मी कशेळकर यांचे ‘भुईरिंगण’ बी. ए.च्या अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:56+5:302021-09-19T04:32:56+5:30

रत्नागिरी : ललित लेखिका रश्मी कशेळकर यांचे ‘भुईरिंगण’ हे पुस्तक बी. ए.च्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आले आहे. ...

Rashmi Kashelkar's 'Bhuiringan' b. In the course of A. | रश्मी कशेळकर यांचे ‘भुईरिंगण’ बी. ए.च्या अभ्यासक्रमात

रश्मी कशेळकर यांचे ‘भुईरिंगण’ बी. ए.च्या अभ्यासक्रमात

Next

रत्नागिरी : ललित लेखिका रश्मी कशेळकर यांचे ‘भुईरिंगण’ हे पुस्तक बी. ए.च्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आले आहे. देवरुख येथील आठल्ये-सप्रे स्वायत्त महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमासाठी या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.

कोकणचा रम्य निसर्ग व समुद्राकाठचे लोकजीवन यांचा भावस्पर्शी नितळ अनुभव हे पुस्तक देते. या पुस्तकाची पहिली आवृत्ती ‘मॅजेस्टिक’कडून व दुसरी आवृत्ती सुरंगी प्रकाशन, रत्नागिरी यांनी प्रकाशित केली आहे. कशेळकर यांचा ‘भुईरिंगण’नंतरचा ‘भुयपर्मळ’ हा मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेला दुसरा ललितलेख संग्रहही अल्पावधीतच यशस्वी ठरला आहे. या पुस्तकाच्या सुयोग्य निवडीने आठल्ये-सप्रे महाविद्यालयाने दर्जेदार साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची आपली परंपरा कायम राखली आहे.

Web Title: Rashmi Kashelkar's 'Bhuiringan' b. In the course of A.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.