मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधावाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:30+5:302021-06-03T04:22:30+5:30
गुहागर : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील ३० गरीब व गरजू कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई ...
गुहागर : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील ३० गरीब व गरजू कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई वासुदेव शेटे सभागृहात प्रातिनिधिक स्वरुपात हा शिधा देण्यात आला. उर्वरित शिधा प्रत्येक कुटुंबाला घरपोच करण्यात आला. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुकुमार मुंजे, भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे, मनप्रवाहचे स्थानिक कार्यकर्ते केशव केसरकर उपस्थित होते.
प्रत्येक कुटुंबाला ५ किलो तांदूळ, ५ किलो पीठ, दोन डाळी, कांदे, बटाटे, मीठ आदी धान्य देण्यात आले. गेली १० वर्ष मनप्रवाह ट्रस्टमार्फत पनवेल शहर परिसरात आम्ही काम करत आहोत. कोकणातील पर्यटन व्यवसायावर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. रोजगार नसल्याने अनेकजण अडचणीत आहेत. त्यांना छोटीशी मदत म्हणून हे शिधावाटप करण्यात आल्याचे मनप्रवाह ट्रस्टचे संस्थापक डॉ. सुकुमार मुंजे यांनी सांगितले.