रत्नागिरी : चोरटी शिकार करणारे जाळ्यात, १३ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:58 PM2018-06-11T12:58:48+5:302018-06-11T12:58:48+5:30

मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार करणाऱ्यांविरूध्द वन विभागाने कंबर कसली आहे. गुरूवारी रात्री चोरटी शिकार करणाºया १३ जणांना अटक करण्यात आले आहे. ​​​​​​​

Ratnagiri: 13 people arrested in a snarl hunting hunt | रत्नागिरी : चोरटी शिकार करणारे जाळ्यात, १३ जणांना अटक

रत्नागिरी : चोरटी शिकार करणारे जाळ्यात, १३ जणांना अटक

Next
ठळक मुद्देचोरटी शिकार करणारे जाळ्यात, १३ जणांना अटक भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल

दापोली : मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार करणाऱ्यांविरूध्द वन विभागाने कंबर कसली आहे. चोरटी शिकार करणाऱ्या १३ जणांना अटक करण्यात आले आहे.

मंडणगड तालुक्यात चोरटी शिकार होत असल्याची गुप्त माहिती दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी सुरेश वरक यांना मिळाली. त्यानंतर चिपळूणचे विभागिय वन अधिकारी विजयराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अमित निमकर, एम. जी. पाटील, एन. के. जांभळे, डी. आर. भोसले, संतोष परशेट्ये, सिध्देश्वर गायकवाड यांच्यासह मंडणगड गाठले. यावेळी त्यांना एक गाडी शिकार करताना आढळून आली. या पिकअप गाडीत तब्बल १३ जण असल्याचे दिसून आले.

वरक व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीचा ताबा घेताना, गाडीतील शिकारीकरिता आणलेल्या सामानाचा ताबा घेतला. त्यानंतर या सर्वांना घेऊन वन विभागाची टीम दापोलीत दाखल झाली.

यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सौरभ लाड (२९), संदेश महाडिक (३२), अनिल बेडेकर (२६), रणजित बाडेकर (२४), अमित पवार (२६), योगेश सावंत (२९), विनय नगरकर (२९), अमित आंबवले (३०), प्रवीण गायकवाड (३२), नीलेश मोटे (४४), रवींद्र जाधव (३२), अविनाश भोसले (२८), अशोक आंबवले यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी त्यांच्याकडून पिकअप गाडी, दोन बंदुका, चार काडतुसे, एक मोठा सर्चलाईट, दोन बॅटऱ्या व एक मेलेला ससा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९, ३९ व ५१ व शस्त्र अधिनियम १९५९चे कलम ३, ४ व २५ व भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ratnagiri: 13 people arrested in a snarl hunting hunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.