रत्नागिरी : बालिकेचा अपघाती मृत्यू; चालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:26 PM2018-11-09T14:26:23+5:302018-11-09T14:27:18+5:30
दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी चारचाकी मागे घेताना तिचा धक्का लागून एक महलिा हातातील आठ महन्यिांच्या मुलीसह खाली पडली व यात या बालिकेला गाडीच्या मागील चाकाचा धक्का लागून या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी चारचाकीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली : तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी चारचाकी मागे घेताना तिचा धक्का लागून एक महलिा हातातील आठ महन्यिांच्या मुलीसह खाली पडली व यात या बालिकेला गाडीच्या मागील चाकाचा धक्का लागून या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी चारचाकीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील केशवनगर (मुंढवा) येथील सुजाता अतुल बनसोडे या आपली मुलगी अवनी (८ महिने) या आपल्या मुलीसह न शिवशाहीने आल्या होत्या तर त्यांचे पती दुचाकीने आले होते. दुचाकीने ते मुरुड येथील समुद्र्रकिनारी पर्यटनासाठी आले होते.
दुचाकी बाजूला ठेऊन अतुल बनसोडे मोबाईलवर बोलत बाजूला गेले असताना अचानक एक कार पाठीमागे येत असताना तिचा धक्का सुजाता यांना लागला. सुजाता व त्यांची मुलगी खाली पडली. यावेळी अवनीच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाला.
कारचे चालक अमित गिरीधर नखाते हे आपल्या कुटुंबयिांसह गाडी (एमएच ३६-एच८४६३) मुरुड येथे पर्यटनासाठी आले होते. गाडीच्या मागील काचेवर धूळ बसल्याने मागील काही दिसले नसल्याने हा अपघात घडल्याचे त्यांनी सांगतिले.
संशयित अमित नखाते यांच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हर्णै पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत. केवळ आठ महिन्याच्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्याने पोलिसांसह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी भावूक झाले होते.