रत्नागिरी : १६६पैकी ५० शिक्षकांचे समायोजन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:48 AM2018-09-28T10:48:52+5:302018-09-28T10:50:49+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
नोकरीनिमित्ताने शहराकडे जाणाºयांची संख्या मोठी असल्याने या सर्वांचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या २६२१ प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये सुमारे ७५०० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. जिल्ह्यातील ० ते १० पटसंख्येच्या सुमारे ६५० शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेने काही शाळा बंद करुन तेथील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले आहे.
या शाळा बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. त्यामुळे अगोदरच शिक्षकांची ओरड सुरु आहे. त्यातच १६६ शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी या शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ५० शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिक्त शाळांमध्ये शिक्षक मिळणार आहेत. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे.