१७ वर्षानंतर रत्नागिरीला अध्यक्षपदाचा मान

By admin | Published: March 22, 2017 01:52 PM2017-03-22T13:52:00+5:302017-03-22T13:52:00+5:30

आमदार उदय सामंत यांनी मानले आभार

Ratnagiri, after 17 years, is named as President of the President | १७ वर्षानंतर रत्नागिरीला अध्यक्षपदाचा मान

१७ वर्षानंतर रत्नागिरीला अध्यक्षपदाचा मान

Next

आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्याला १७ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे मानाचे स्थान मिळाले. जयसिंग घोसाळे यांच्यानंतर स्रेहा सावंत यांना हा मान मिळाला. त्याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख विजय कदम यांचे आमदार उदय सामंत यांनी आभार व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद येथे नवीन अध्यक्षपद देण्याचे धाडस शिवसेनेने केले. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील स्नेहा सावंत यांना दिले. पुढील सव्वा वर्षासाठी स्वरुपा साळवी यांना अध्यक्षपद, तर संतोष गोवळे यांना उपाध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
नवीन चेहऱ्यांना संधी देऊन ते समाजकारण करु शकतात, हा राज्यातील जनतेसमोर शिवसेनेने आदर्श ठेवला. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्यासाठी आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. तसेच सर्वच आमदार एकत्रित येऊन जिल्हा परिषदेत चांगले काम करु, अशीही त्यांनी ग्वाही दिली. (शहर वार्ताहर)

Web Title: Ratnagiri, after 17 years, is named as President of the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.