रत्नागिरी अग्नीशमन केंद्र उद्घाटनाच्या आशा पल्लवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:35 PM2018-11-21T14:35:38+5:302018-11-21T14:37:36+5:30

एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे.

Ratnagiri AgniShaman center is expected to be inaugurated | रत्नागिरी अग्नीशमन केंद्र उद्घाटनाच्या आशा पल्लवीत

रत्नागिरी अग्नीशमन केंद्र उद्घाटनाच्या आशा पल्लवीत

googlenewsNext
ठळक मुद्देया केंद्राचा, निवासी इमारतींचा वापर होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. अन्य शासकीय कर्मचाºयांना ही निवासस्थाने वापरण्यासाठी दिली जातील, असे संकेत

रत्नागिरी : एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे. याठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या केंद्राला जिल्हाधिकारी यांनी भेट दिल्याने केंद्राच्या उद्घाटनाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या छोट्या-मोठ्या ७ उद्योग वसाहती आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात कोणताही अपघात घडल्यास त्यासाठी अग्नीशमन यंत्रणा सुसज्ज राहावी यासाठी जिल्ह्यात अग्नीशमन केंद्राची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार रत्नागिरी एमआयडीसीमधील जागेत अग्नीशमन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे सव्वाचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या इमारतीमध्ये अग्नीशमन केंद्र तसेच कर्मचाºयांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. 

दोन वर्षांपूर्वीच या इमारतीचे काम पूर्ण झालेले असताना, तिचे उदघाटन का रखडले, याची  प्रत्यक्ष खातरजमा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. इमारतीची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. अग्नीशमन यंत्रणेसाठी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून, त्याच्याच बाजूला तीन इमारतींमध्ये कर्मचाºयांसाठी प्रशस्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे २४ ते २५ फ्लॅट उपलब्ध असून, त्यांचेही उदघाटन झालेले नाही. या केंद्राचा, निवासी इमारतींचा वापर होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत प्रत्यक्ष पहाणीवेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाºयांकडे विचारणाही केली. 

आता लवकरच या इमारतींचे उदघाटन केले जाणार असून, कर्मचारी निवासाचीही सोय केली जाणार आहे. तसेच जर अग्नीशमन कर्मचारी उपलब्ध नसतील तर अन्य शासकीय कर्मचाºयांना ही निवासस्थाने वापरण्यासाठी दिली जातील, असे संकेत जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

Web Title: Ratnagiri AgniShaman center is expected to be inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.