रत्नागिरी : अंत्योदय, प्राधान्य कार्डधारकांची दिवाळी गोड, आता चणाडाळ, उडीदडाळ बरोबरच साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:06 PM2018-10-23T17:06:32+5:302018-10-23T17:07:56+5:30
दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी ह्यगोडह्ण होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.
रत्नागिरी : दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.
गेल्या सोमवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ही घोषणा केली असून तसा शासन अध्यादेशही काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति कुटुंब एक किलो साखर मिळत होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच रास्त दर धान्य दुकानांवर ३५ रूपये किलो दराने तूरडाळही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यातच आता दिवाळी जवळ आल्याने राज्याच्या पुरवठा विभागाने पुन्हा प्रति कुटुंब एक किलो चणाडाळ तसेच उडीद डाळ ३५ रूपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी आॅक्टोबर महिन्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांबरोबरच प्राधान्य गटालाही साखर मिळणार आहे. दिवाळीपुर्वीच जिल्हा पुरवठा विभागाकडे या महिन्यातच साखर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी का होईना पण प्राधान्य कुटुंबाला साखर मिळणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.
तसेच पुरवठा मंत्री बापट यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता चणाडाळ आणि उडीदडाळही या महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ४२,२९७ तसेच प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबे २,३७,२४७ इतकी आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपुवी चणाडाळ आणि उडीद डाळ रेशनदुकानांवर उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकी २७९५ क्विंटलची मागणी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत धान्य जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याचे डॉ. फड यांनी सांगितले.
जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक ४२,२९७ इतके आहेत. आत्तापर्यंत या शिधापत्रिकावरील कुटुंबासाठी प्रति किलो साखर रेशनदुकानावर दिली जाते. मात्र, केवळ दिवाळीसाठी एक महिन्याकरिता प्राधान्य कुटुंबाला एक किलो साखर दिली जाणार आहे. मात्र, यापुढे या दोन्ही शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ, चणाडाळ तसेच उडीदडाळ प्रतिकिलो ३५ रूपये दराने एक किलो डाळ मिळणार आहे.