रत्नागिरीतील हरचेरीचे सुपुत्र भालचंद्र झोरे सीमेवर शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 09:39 PM2019-10-18T21:39:53+5:302019-10-18T21:43:03+5:30
शहीद झोरे यांचे मूळ गाव हरचेरी असून, सध्या पुणे येथे कुटुंब वास्तव्यासाठी असते. झोरे कुटुंबाचे अधुनमधून विशेष कामानिमित्ताने गावाला येणेजाणे असते.
रत्नागिरी : तालुक्यातील हरचेरी येथील भालचंद्र रामचंद्र झोरे हे जवान इलाहाबाद येथे सीमेवर कामगिरीवर असताना गुरूवारी मध्यरात्री त्यांना वीरमरण आले. हे वृत्त कळताच त्यांच्या गावी हरचेरी अहिल्यानगर येथे शोककळा पसरली आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शहीद झोरे यांचे मूळ गाव हरचेरी असून, सध्या पुणे येथे कुटुंब वास्तव्यासाठी असते. झोरे कुटुंबाचे अधुनमधून विशेष कामानिमित्ताने गावाला येणेजाणे असते. गुरूवारी मध्यरात्री इलाहाबाद येथे सीमेवर कार्यरत असतानाच भालचंद्र झोरे यांना वीरमरण आले. त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त गावात कळताच गावावर दु:खाचे सावट पसरले.
शनिवारी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी हरचेरी अहिल्यानगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी प्रतिभा, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.