रत्नागिरी : प्रदूषणमुक्तीसाठी क्षितीज विचारेची सायकल सफर, गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ प्रवास करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:35 PM2018-02-06T18:35:43+5:302018-02-06T18:40:12+5:30
नागळोली (ता. श्रीवर्धन) येथील क्षितीज संजय विचारे (२६) हा तरूण गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ असा सायकलने प्रवास करणार आहे. तरूणवर्गाला फिटनेसचे महत्व कळावे, तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळावी, असा संदेश जगाला देण्याच्या उद्देशाने क्षितीज सायकलने नेपाळ सर करण्यास निघाला आहे.
देव्हारे (ता. मंडणगड ) : नागळोली (ता. श्रीवर्धन) येथील क्षितीज संजय विचारे (२६) हा तरूण गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ असा सायकलने प्रवास करणार आहे. तरूणवर्गाला फिटनेसचे महत्व कळावे, तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळावी, असा संदेश जगाला देण्याच्या उद्देशाने क्षितीज सायकलने नेपाळ सर करण्यास निघाला आहे.
२६ जानेवारी रोजी गेट वे आॅफ इंडियापासून क्षितीजने सायकल प्रवासाला सुरूवात केली आहे. गेट वे ते नेपाळ असा हजारो किलोमीटरचा प्रवास गोवा, कन्याकुमारी, कोलकाता, सिक्कीम, भुतानमार्गे नेपाळ असा प्रवास करणार असल्याचे त्याने लोकमतला सांगितले.
क्षितीज हा प्रवास तीन महिन्यात पूर्ण करणार आहे. प्रवास सुरू झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र दवंडे व रत्नकांत सावंत यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी क्षितीजला शुभेच्छा दिल्या.
नागळोलीसारख्या ग्रामीण भागातील तरूण, जगाला प्रदूषणापासून कसे वाचता येईल, याबाबत जागृती करण्यासाठी तो सवारी करत आहे. हे पाहून, अनेकांकडून त्याच्या या कामाचे कौतुक होत आहे.